आशादीप महिला वसतिगृहास केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शिशुंसाठी दोन पाळणे भेट

 

जळगाव, प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गणेश कॉलनी येथील आशादीप महिला वसतीगृहास शिशुंसाठी दोन पाळणे भेट देण्यात आले.

परितक्त्या महिला, कुमारी माता, पीडित-शोषित महिलांसाठी गणेश कॉलनी येथे आशादीप महिला वसतीगृह चालविले जाते. अनेक महिलांसोबत असणाऱ्या आपल्या बाळांसाठी या शिशुगृहात पाळण्याची सोय नव्हती. या मुलांना झोळी करून झोपविण्याची व्यवस्था केली जात होती. ही अडचण लक्षात घेऊन केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आशादीप महिला वसतीगृहास दोन पाळणे भेट देऊन वसतीगृहाच्या अधिक्षिका जयश्री पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. आपल्या बाळांसाठी मिळालेल्या पाळण्यांमुळे तेथील महिलांना आनंद झाला व त्यांनी चाईल्ड लाईनचे आभार मानले.  दोन मातांनी आपल्या बाळांना प्रत्येक्ष झोपवून पाळण्याचा आनंद घेतला. अनेक दिवसांपासून पाळण्याची गरज असताना केशवस्मृतीने ही गरज ओळखून पूर्ण केल्याबद्दल जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतात आभार व्यक्त केले.

     यावेळी चाईल्ड लाईनचे समन्वयक भानूदास येवलेकर, समुपदेशिका वृशाली जोशी, टिम सदस्य रोहन सोनगडा, राहुल महिरे, समतोलच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव, सेवावस्ती विभागाच्या व्यवस्थापिका स्नेहा तायडे, नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका राजश्री डोलारे उपस्थित होत्या.

Protected Content