उघड्यावर शौचालयाला बसणे जीवावर बेतले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे रूळाजवळ शौचालयाला (Toilet Setting) बसणे वृध्द व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची घटना मंगळवारी घडली आहे. यात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ६० वर्षीय वृध्द व्यक्ती जागीच ठार (fatal) झाल्याची घटना समोर आली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक नंदलाल चव्हाण (वय-६०) रा. हिंगोणेकर ता. धरणगाव ह. मु. खंडेराव नगर, जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, अशोक चव्हाण हे पत्नी, मुलगा व सुना यांच्यासोबत खंडेराव नगरात वास्तव्याला होते. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अशोक चव्हाण हे घरापासून जवळ असलेल्या रेल्वे रूळाजवळ शौचालयासाठी गेले. दरम्यान, धावत्या रेल्वेचा त्यांच्या डोक्याला फटका बसल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परिसरातील राहणारे तरूणांनी अशोक चव्हाण यांची ओळख पटविली. याबाबत रामानंदनगर पोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात (ramanand nagar police station)अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पो.कॉ. रेवानंद साळुंखे, निलेश पाटील हे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी जिजाबाई, राजेंद्र आणि ज्ञानेश्वर ही दोन मुले, मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content