आव्हाणे गावात एकाच रात्री तीन ठिकाणी बंद घर फोडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे शनिवारी रात्री रिक्षाने आलेल्या चोरट्यांनी एकाच रात्री तीन घर फोडून चोरी केल्याची घटना रविवारी २१ मे रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील सरुआई नगरातील तुषार सपकाळे, साहेबराव नारायण पाटील व प्रताप जिभाऊ नगरातील भागवत इंगळे यांच्या घरी ही चोरी झाली आहे. तर सरुआई नगरातीलच मच्छिंद्र पाटील यांचे घर देखील फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तुषार सपकाळे यांच्या नातेवाईकाकडे गावातच लग्न असल्याने सपकाळे हे रात्री घर बंद करून, लग्नघराकडे गेले होते. तर साहेबराव पाटील हे आपल्या परिवारासह बाहेर गावी गेले होते. बंद घर पाहून ही घरं फोडल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली. सरुआई नगरातील एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार पहाटे ३ वाजेच्या सुमारास काळ्या रंगाची रिक्षा गल्लीत घुसली. मात्र, गल्लीतील कोणाकडे ही रिक्षा आली असल्याचे वाटल्यामुळे या रिक्षाबाबत संशय आला नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content