मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ वरुन ६० वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजेश टोपेंनी ही माहिती दिली.
शरद पवारांशी सविस्तर चर्चा केली, सध्याची परिस्थिती सांगितली. त्यानंतर शरद पवारांनी तातडीने केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी २० मिनिटे चर्चा केली. राज्य सरकार मेडिकल कॉलेजना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. पण मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करुन द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असे टोपेंनी सांगितले.