छुपा प्रचार, आर्थिक देवाण-घेवाणवर पोलिसांची करडी नजर

 

108366202 39ee1809 37a7 429a 8e86 fe940e53e240

 

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदानापर्यंतचे उरलेले काही तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पक्ष, उमदेवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून छुपा प्रचार होण्याची शक्यता आहे. हा छुपा प्रचार, आर्थिक देवाण-घेवाण यावर पोलिसांच्या वतीने राज्यभरात करडी नजर ठेवली जात आहे.

 

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शनिवारी सायंकाळी प्रचार बंद करण्यात आला. उघडपणे करायचा प्रचार संपला असला, तरी छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित केले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथक सज्ज आहेत. आर्थिक तसेच भेटवस्तूंची देवाणघेवाण तसेच प्रलोभने रोखता यावीत, यासाठी उमेदवार तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. रात्रीच्या वेळी हे प्रकार अधिक प्रमाणात घडत असल्याने रात्रीची गस्त आणि नाकाबंदी यावर विशेष भर दिला जात. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून पायी गस्त, नाकाबंदी, वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन यावर भर दिला जात आहे.

Protected Content