राहूल गांधी मैत्रीणीसोबत नाईट क्लबमध्ये : व्हायरल व्हिडीओमुळे वादंग !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे कॉंग्रेसच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होत असतांनाच राहूल गांधी हे काठमांडूतील एका नाईट क्लबमध्ये मैत्रीणीसोबत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहूल गांधी यांचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला असून यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करून हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते. आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच असल्याची टीका मालवीय यांनी केली. आहे.

यासोबत भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी देखील याबाबत हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार होत असताना राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे, राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्यांनी भारतातील लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. तसेच, किरण रिजजू यांनी देखील राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला. सुट्टी, पार्टी, हॉलिडे, पिकनिक, खासगी टूर या गोष्टी आता देशासाठी नवीन नाहीत, असं रिजजू म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: