नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय कोरोनाचा विषाणू

 

बर्लिन: वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. विविध पातळीवर संशोधन करण्यात येत आहे. नव्या संशोधनानुसार, कोरोनाचा विषाणू नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करत असल्याचे समोर आले आहे.

‘नेचर न्यूरोसायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.अभ्यासात कोरोना शरीराच्या विविध अवयवांपर्यंत कसा जातो याबाबतची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. वास, चव नसणे, डोकेदुखी, थकवा अशा प्रकारची लक्षणे संबंधित रुग्णाला दिसू लागतात. थेट मेंदूपर्यंत
कोरोना पोहोचल्यानेच हा त्रास होत असल्याचे अभ्यास सांगतो. या संशोधनामुळे रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे काय आहेत आणि त्यांच्यावर उपचार कसे केले जावे याबाबत मदत होणार आहे.

जर्मनीतील चारिटे विद्यापीठातील संशोधकांनी श्वासनलिकेची (घश्याच्या वरच्या भागापासून ते नाकापर्यंत) तपासणी केली. या संशोधनात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांचाही समावेश होता. यामध्ये ११ महिला आणि २२ पुरुष होते. मृतांचे सरासरी वय हे ७१.६ टक्के होते. लक्षणे आढळण्यापासून ते मृत्यू होईपर्यंतचे सरासरी ३१ दिवस ते जगले. संशोधकांना मेंदू आणि श्वसन नलिकेत सार्स-सीओव्ही२ आरएनए आणि प्रोटीन आढळले.

Protected Content