आरोग्यासाठी तृणधान्येच उत्तम : पंतप्रधान

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या मासिक कार्यक्रमातून ज्वारी आणि बाजरीच्या महत्वाबाबत विवेचन केले.

आज यंदाचा पहिल्याच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी विविध विषयांना स्पर्श केला. यात प्रामुख्याने त्यांनी तृणधान्याचे महत्व सांगितले. यंदा तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. या अनुषंगाने ते म्हणाले की, भारतात प्रामुख्याने पीकणारे तृणधान्ये हे अतिशय पौष्टीक आहेत. यामुळे आपण त्यांचा दैनंदिन भोजनात अवश्य समावेश करावा.

दरम्यान, पंतप्रधानांनी आपल्या मनोगतात म्हटले की, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. आपला देश लोकशाहीची जननी आहे. याचा आम्हा भारतीयांना अभिमान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. लोकशाही आपल्या रक्तात आहे, आपल्या संस्कृतीत आहे. शतकानुशतके आपल्या कार्याचा तो अविभाज्य भाग आहे. आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत असंही मोदी म्हणाले.

Protected Content