आयटकचे विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । येथे जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक)तर्फे विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन कॉ. अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत पगार भविष्य निर्वाह निधीचा हिशोब मिळावा यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची गेल्या मार्च महिन्यापासून पगार थकीत आहे. ग्रामपंचायतींनी त्यांच्या हिश्याचे वेतनाचे अनुदान व राहणीमान भत्त्याची रक्कम दिलेली नाही. दिवाळीपूर्वी थकीत वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली. ज्यांचे ऑनलाईन पगार होत आहे त्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कापला जात आहे, ,त्याचा हिशोब मिळालेला आहे. परंतु, यात ग्रामपंचायतीचा हिस्सा नाही, तरी ग्रामपंचायतीनी त्यांचा हिस्सा बँकेत जमा करावा आदी मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाला चोपडा जळगाव बोदवड तालुक्यातून चांगल्या संख्येने कर्मचारी आले होते. शिवाय पाचोरा धरणगाव एरंडोल यावल अमळनेर जामनेर या तालुक्यातून प्रतिनिधी आले होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सुभाष कलाल ,सुनील कोळी , लहुजी गायकवाड ,सिकंदर तडवी ,सुनील कोळी ,रवींद्र पाटील ,मधुकर जंगले , उखर्डू ढीवर किशोर इंगळे निलेश गोपाळ ,जिजाबराव पाटील ,भाऊसाहेब पाटील ,प्रकाश रल अशोक गायकवाड ,आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/855399671872622/

 

Protected Content