दुचाकी चोरट्यास चाळीसगावातून अटक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा रुग्णालयातून हँडल लॉक तोडून दुचाकी चोरणार्‍या शफीखान अन्वरखान पठाण (26, रा.चाळीसगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी चाळीसगाव येथून अटक केली.

जिल्हा रुग्णालयात तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूषण सुभाष धनके (26, रा.राम पेठ) हा तरुण इंटन डॉक्टर म्हणून कार्यरत असतांना 19 ऑक्टोबर 2015 रोजी जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंग शेडमध्ये लावलेली त्याची दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.एस.7809) चोरी झाली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पाच वर्षापासून फरार असलेला संशयित शफीखान हा चाळीसगाव येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहूल पाटील, प्रीतम पाटील व नितीन बाविस्कर यांचे पथक रवाना केले. पथकाने मंगळवारी शफीखान यास चाळीसगाव बसस्थानक आवारातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

Protected Content