आमदार मंगेश चव्हाण यांनी पकडली अवजड वाहने

चाळीसगाव प्रतिनिधी । आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अवैध पध्दतीत शहरातून वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

चाळीसगाव शहर चार जिल्हयांच्या सीमेवर असल्याने तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ व राज्य महामार्ग शहराला लागूनच गेल्याने मोठया प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक चाळीसगाव शहराजवळून होत असते. या पार्श्‍वभूमिवर, आमदार मंगेश व्हाण यांनी अवजड वाहनांना पकडले. आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने अखेर आमदार चव्हाण,नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील यांनी भाजपच्या पदाधिकारी यांच्या मदतीने शहरात येणार्‍या अवजड वाहनांना अडवून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास धुळेरोड उड्डाण पुलाजवळील न्यायालयासमोर उभे राहून ही अवजड थांबविली व इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. अवघ्या तासाभरात दोन किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने ही चोरटी वाहतूक किती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघड झाले. यातील जवळपास १२ वाळूने भरलेले मोठे ट्रक शहर वाहतूक शाखेच्या ताब्यात देण्यात आले. यातील एका वाहनात हाडांची पावडर आढळून आली. तर बरेचसे वाहक हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले.

Protected Content