चोपडा शहर भाजपा कार्यकारिणी जाहीर

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील शहर भारतीय जनता पार्टीची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात नूतन शहराध्यक्षगपदी गजेंद्र जैसवाल तर उपाध्यक्षपदी डॉ. आशिष अशोक पाटील यांची निवड जाहीरकरण्यात आली आहे.

चोपडा शहर भाजपा कार्यकारिणीत इतर सदस्य पुढील प्रमाणे आहेत. यात उपाध्यक्ष , लक्ष्मण भगवान माळी, प्रवीण ईश्वर चौधरी, वंदना कैलास पाटील, गोपाल पांडुरंग पाटील, माधुरी प्रफुल्ल अहिरराव,सरचिटणीस मनोहर नामदेव बडगुजर, सुनील मनोहर सोनगिरे,चिटणीस गणेश भागवत पाटील, योगेंद्र मुरलीधर देवरे, अनिता अरुण नेवे, रंजना रवींद्र मराठे, रत्ना भगवान लोहार.कोषाध्यक्ष रिखबराज अमृतराज सुराणा, प्रसिद्धी प्रमुख यशवंत गोपाळ जडे, सोशल मिडीया प्रमुख योगेश पंढरीनाथ बडगुजर, कार्यालयीन मंत्री मोहित पांडुरंग भावे यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी पालकमंत्री आ.गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे, संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जावळे तसेच तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content