स्नेहा चौधरी यांची वाहन निरीक्षकपदी निवड

कासोदा, प्रतिनिधी । येथील स्नेहा चौधरी हिची वाहन निरीक्षक म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड झाली असून तीने नुकताच नासिक आर. टी. ओ. कार्यालयात पदभार स्विकारला आहे.

सरकार साहेब रावल माध्यमिक विद्यालयातील शिक्षक एम. एस. चौधरी यांची सुकन्या असून कवयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ विद्या परिषद सदस्य  प्रा. डॉ. जी. बी. चौधरी  यांची स्नुषा आहे. तिचे पती विशाल चौधरी हे हॉकिन्स इंडिया या कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजरपदी आहेत. स्नेहा चौधरीने प्राथमिक शिक्षण दादासाहेब रावल प्राथमिक विद्यालय दोंडाईच्या येथे केले असून माध्यमिक शिक्षण गर्ल्स हायस्कूल दोंडाईचा येथे केले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण एस. एस. व्ही. पी. एस. इंजीनियरिंग कॉलेज धुळे येथे केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात तिने हे यश संपादन केले आहे. २०१७ वर्षाली झालेल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे पूर्व परीक्षा एप्रिल २०१७, लग्न मे २०१७ व मेन्स परीक्षा जुलै २०१७ अशा झाल्या असतानाही तिने हे यश संपादन केल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे. राज्याचे माजी कॅबिनेट पर्यावरण मंत्री जयकुमार भाऊ रावल समाजाच्या सर्व स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Protected Content