जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जामनेर तालुकाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यात रक्तदान शिबीर, फळ वाटप यासारखे घेण्यात आले.
जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा ग्रामीण उप रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच नेरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी आमदार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील भाऊंनी केलेल्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी नगर पालिका गटनेते डॉ. प्रशांत बोंडे, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, अतिश झाल्टे, अतिश झाडे, अनिस शेख, उल्हास पाटील, सुहास पाटील, बाबुराव हिवराळे, रवींद्र चालते, आनंदा लावरे, विलास पाटील, नवल पाटील, निलेश चव्हाण, रमेश नाईक यांच्यासह जामनेर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक पंचायत समिती सदस्य तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते