रावेरात बांधकाम विभागात अधिकारी गायब – नागरीकांमध्ये संताप

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेरात जिल्हा परीषद बांधकाम विभागात अधिकारी सतत गायब राहत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथील अभियंता साईटवर असल्याच्या नावाखाली कार्यालयात येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून तक्रारी घेऊन आलेल्या नागरीकांची चांगलेच हाल होत आहे.

येथील जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बि व्ही वानखेडे यांचे कार्यालयाकडे दुर्लक्ष होत असते आठवड्यातील दोन दिवस साहेब धुळ्याला असतात नेहमी साईटवर असल्याचे सांगून नागरीकांना टोलवा टोलवी करत असल्याचा आरोप होत आहे. येथील कार्यालय प्रमुखच कार्यालयातून सतत गायब राहत असल्याने याची संधी साधून येथे असलेले शाखा अभियंता एस. एम. पाटील व आय. वाय. पाटील जळगाव येथून अप-डाऊन करत असतात.

याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पकंज आशिया यांनी लक्ष घालण्याची मागणी जनतेतून होत आहे. सततच्या दांड्या संदर्भात उपविभागीय अभियंता बि. व्ही. वानखेडे यांच्याशी संर्पक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच वरीष्ठ अधिका-यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडत आहेत.

Protected Content