धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ग्रामीणमधील महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये जनतेशी संवाद साधत त्यांना कौल मागितला आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पद्मालय येथील श्री गणेशाला वंदन करून आपला प्रचार सुरू केला असून ते प्रत्येक गावात जाऊन जनतेला साद घालत आहेत. काल त्यांनी जळगाव तालुक्यातील पिंप्री, कानळदा आणि म्हसावद येथे प्रचार फेरी काढली. तर आज कुसुंबा, धानवड या गावांमध्ये त्यांची प्रचार फेरी काढण्यात आली.
ना. गुलाबराव पाटील यांनी आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेने लागोपाठ तिसऱ्यांना विजयी करण्याचे लोकांना आवाहन केले आहे. त्यांचे प्रत्येक गावात अतिशय उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रचार फेरीत त्यांच्या सोबत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.