आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग : राहूल नार्वेकर घेणार मोठा निर्णय ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या सत्तासंघर्षातील महत्वाचा निर्णय घेण्याच्या कार्यवाहीला वेग आल्याचे आता दिसून येत आहे.

 

गेल्या वर्षीच्या मध्यावर झालेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. यात कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय हे विधानसभेचे अध्यक्ष अर्थात राहूल नार्वेकर घेतील असा निकाल दिला होता. यामुळे आता नार्वेकर कसा आणि कधी निकाल देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

 

विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे.त्यासाठी अधिकृत पत्रही देण्यात आलं आहे. या कार्यवाहीत गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली. साधारणपणे आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधीच याबाबतचा निकाल विधानसभाध्यक्ष घेतील अशी शक्यता आहे.

Protected Content