आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या ‘त्या’ प्रियकाराविरोधात गुन्हा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुला माझ्यासोबतच लग्न करावे लागेल, तुझे दुसरीकडे लग्न होवू देणार नाही. अशी धमकी देवून तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकराविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राधाबाई दिलीप जाधव या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे.  २४ जून रोजी दुपारी ३ वाजता त्या कामावर असतांना त्यांना प्रकाश कापसे यांनी फो तुम्ही ऑर्कीड हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. त्यानुसार राधबाई या हॉस्पिटलमध्ये गेल्या असता, त्यांना आपली मुलगी दिव्या हीने गळफास घेतल्याचे समजले. याठिकाणावरील व्हेंटीलेटर सुविधा नसल्याने तीला दुसर्‍या खासगी रुग्णालयता दाखल केले. परंतु दिव्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखलकेले. याठिकाणी तिच्यावर उपचार सुरु असतांना १३ जुलै रोजी तीची प्राणज्योत मालवली होती.

 

लग्नाविषयी बोलल्याने केले अपमानित

राधाबाई यांची चुलत नणंद लक्ष्मीबाई यांचा मुलगा निलेश याच्यासोबत दिव्या दोन वर्षांपासून बोलत होती. निलेश नात्यातीलच असल्याने दिव्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत निलेशच्या घरी लग्नाविषयी बोलणी करण्यास गेले होते. परंतु निलेशच्या आईने तुमच औकात आहे का? आमच्या घरात मुलगी देण्याची असे बोलल्याने जाधव कुटुंबिय त्याठिकाणाहून निघून आले होते.

 

गायकवाड यांन अपमानित केल्यानंतर देखील दिव्या व निलेश हे दोघ फोनवर बोलत होते. यावेळी राधाबाई यांनी निलेशला माझ्या मुलीला फोन करु नको असे सांगितले. तसेच तिच्यासाठी मुलगा देखील पसंत केला होता. व त्याला बघण्यासाठी २६ जून रोजी जाधव कुटुंबिय मुलाकडे जाणार होते. परंतु त्यापुर्वीच दिव्याने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर दिव्याचा भाऊ सागर याने तिचा मोबाईलच चेक केला. यावेळी दिव्यासोबत निलेशचे फोटो व तिच्याशी इनस्टाग्रावर व व्हाट्सऍपवर चॅटींग केली होती. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्डिंग देखील मिळून आली. आत्महत्येपुर्वी शेवटचा कॉल दिव्याला शेवटचा कॉल हा निलेश याचा असल्याने त्यानेच दिव्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content