आता लसींची कमतरता भासणार नाही? , आरोग्यमंत्री बदलल्यानंतर राहुल गांधींचा सवाल

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय आरोग्यमंत्री बदलल्यावर आता कोरोना लसींची कमतरता भासणार नाही का? , अशी  खोचक टीका आज पुन्हा राहुल गांधी यांनी केली  आहे

 

मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. यामध्ये अनेक मंत्र्याना डच्चू देण्यात आला. डॉ. हर्ष वर्धन यांना केंद्रीय आरोग्यमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले. दरम्यान, मनसुख मंडाविया यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे. देशात करोना काळात डॉ. हर्ष वर्धन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. लसीच्या तुटवड्यामुळे त्यांना लोकांच्या रोषाचा देखील सामना करावा लागला.   आरोग्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल केला आहे.

 

राहुल गांधी ट्विट करत सवाल विचारला आहे. “याचा अर्थ यापुढे लसीची कमतरता भासणार नाही?.” यासोबत राहुल गांधींनी ‘चेंज’ असा हॅशटॅग दिला आहे.

 

 

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे ‘बेजबाबदार’ आहेत आणि कोणत्याही कारणाशिवाय टीका करतात, असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींवर पलटवार केला.

 

देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८१७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी ५०० पेक्षा ही कमी होती. मात्र अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत ४५,८९२ नव्या  बाधितांची नोंद झाली आहे.

 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४५,८९२ नवीन बाधित आढळून आले आहेत आणि ८१७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी दिवसभरात ४४,२९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

Protected Content