पिंपळवाड म्हाळसा येथील विकासोत ५१ लाख २९ हजाराचा अपहार; १७ जणांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथील विविध कार्यकारी सोसायटीत २०१५ ते २०२० दरम्यान विकासोचे सचिव, चेमरमन आणि संचालक मंडळ यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप दर्शवून खोट्या नोंदी घेवून शासनाची सुमारे ५१ लाख २९ हजार ६१२ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात विकासोचे सचिव, चेमरमन आणि संचालक मंडळासह एकुण १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथील विविध कार्यकारी सोसायटीत गैरव्यवहार झाल्याची तक्रारीवरून शासनाने दिलेल्या १७ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार व आदेशानुसार संस्थेचे लाखपरिक्षण करण्यासाठी लेखपरिक्षक मंगेश आरशी वळवी (वय-४१) रा. जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली होता. चौकशी विकासो संस्थेत चेअरमन, सचिव आणि संचालक मंडळ यांनी  संस्था स भासदांना कर्ज येणे बाकी निरंकबाबत दाखले दिलेले, बेकायदेशीररित्या परस्पर कर्ज वाटप दर्शवून रकमेचे चेक व विड्रॉवल खोट्या व बनावट सह्या करून कर्ज रकमेची स्वत:च्या फायदा संस्थेच्या कर्ज खतावणीला येणे, कर्ज बाक्यांमध्ये खाडाखोड व गिरवागिरव करून प्रत्यक्षात कर्ज वसूल रजिष्ट्रारमध्ये तफावत व चेकच्या खोट्या नोंदी असा एकुण २३ लाख ०२ हजार ३४२ रूपयांचा अपहार केला.  त्यानंतर शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ आणि महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी व कर्जमुक्ती योजनांमध्ये प्रत्यक्षात वाटप नसलल्या कर्ज रकमेच्या त्यांना चुकीच्या व खोट्या नोंदी करून बोगस कर्ज वाटप रकमांचा एकुण १६२ सभासदांचा सुमारे २७ लाख ५७ हजार ६०९ एवढी शासनाची फसवणू केली. आसा एकुण ५१ लाख २९ हजार ६१२ रूपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. 

यांच्यावर १७ जणांवर झाला गुन्हा

लेखापरिक्षक मंगेश आरशी वळवी (वय-४१) रा. जळगाव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी वासुदेव भिका माळी, दिगंबर मोतीराम पाटील, कैलास सजन चौधरी,ख्‍ प्रकाश रामचंद्र माळी, बेवाबाई सूपडू माळी, शेनफडू दोधा पाटील, संचालक एकनाथ सहादू पाटील, चिंतामण हरी अहिरे, दयाराम दगा माळी, लक्ष्मण जयराम माळी, सखाराम मोतीराम तिरमली, सुकदेव नारायण पाटील, शोभा रमेश पाटील सर्व रा. पिंपळवाड म्हळसा,  सचिव रामचंद्र बबुवहन पाटील, रा. उंबरखेड , आर.एल.वाघ, बी.पी. साळुंखे, डी.यु. पवार तिघे रा. चाळीसगाव या १७ जणांवर संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेमंत शिंदे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!