आता करुणा शर्माचीच धनंजय मुंडेंविरोधात बलात्कार, घरगुती हिंसाचाराची तक्रार !

 

मुंबई : वृत्तसंस्था । सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता संबंध असल्याचं मान्य केलेल्या करुणा शर्मा यांनीच बलात्कार आणि घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. दोन्ही मुलांना चित्रकूट बंगल्यात कोंडून ठेवल्याचाही आरोपही त्यांनी केला आहे

यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती.

आता धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेबाबत आपण सहमतीने संबंधात होतो असे मेनी केले होते , त्या करुणा शर्मा यांनी मौन सोडलं आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत ३ महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे सबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचं याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केलं होतं. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची करुणा शर्मा यांची मागणी आहे.

Protected Content