सातगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील लय भारी क्रिकेट क्लब तर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे (धोबी) यांच्या हस्ते करण्यात आले.

क्रिकेट स्पर्धेमध्ये मराठवाडा आणि खानदेशातील तीस क्रिकेट संघांनी नाव नोंदवलेले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले असून, यावेळी शंकर पवार, सागर चौधरी, सुभाष पाटील, आकाश डांबरे उपस्थित होते. सातगाव (डोंगरी) या गावाची परंपरा विविध प्रकारे नटलेली आहे. या गावावर जोगेश्वरी मातेची कृपा असल्याचेही बोलले जाते. लय भारी क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस ज्ञानेश्वर पुंडलिक यांनी यांच्यातर्फे ११ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ज्ञानेश्वर शालिग्राम चौधरी यांच्यातर्फे ७ हजार १०० रुपये, तृतीय बक्षीस शंकर बाजीराव पवार यांच्यातर्फे ५ हजार १०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट खेळाबद्दल हॅट्रिक षटकार- आकाश भास्कर डांबरे, हॅट्रिक चौकार- सुभाष धनराज पाटील, हॅट्रीक विकेट- तुषार परमेश्वर चौधरी, सुपर कॅच- संदीप भिला पवार, सुपर फिफ्टी- किरण नंदलाल कोठावदे, मॅन ऑफ द मॅच- आप्पा रामदास पाटील, सुपर ओहर – बापू परदेशी यांचेतर्फे ५०१ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक बापू परदेशी, निखिल तडवी, तुषार चौधरी, बबलू सय्यद सह गावातील युवक परिश्रम घेत आहेत.

Protected Content