मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहे. यामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष माहिम मतदारसंघाकडे लागलेले असून तेथे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.
मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवार दिल्याने माहिम मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमित ठाकरेंविरोधात शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली असून आता या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.