आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था| आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.

विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

Protected Content