अस्मिता प्रतिष्ठानतर्फे आदिवासींना मदतीचा हात

यावल प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या आदिवासींना येथील अस्मता प्रतिष्ठानतर्फे जीवनोपयोगी वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला.

सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणारे मोलमजुरी सध्या बेरोजगार झाल्याने त्यांच्याकडून कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या अनुषंगाने जवळच असलेल्या बोरावल गावाच्या रस्तावर मोलमजुरी करणार्‍या आदिवासी बांधवांच्या पाड्यावर जाऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून यावल शहरातील युवकांनी स्थापन केलेल्या मराठी अस्मिता प्रतिष्ठानच्यावतीने धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष चेतन अढळकर, उपाध्यक्ष प्रशांत कासार, सचिव सुनील गावडे, कोषाध्यक्ष अशोक पाटील, शिवाजी बारी, नितीन बारी, डॉ. सागर चौधरी, अ‍ॅढ. देवेंद्र बाविस्कर, संदीप कुलकर्णी, प्रमोद देवरे, अजय फेगडे, उमेश हेगडे, योगेश देशमुख, राहुल फेगडे, पंकज कासार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पाड्यावर राहणार्‍या सर्व आदिवासी बांधवांनी मराठी अस्मिता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Protected Content