निलॉन्स कंपनी कडून उत्राण गावात फवारणी

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील उत्राण येथे निलॉन्स कंपनीतर्फे संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांनी निलॉन्स कंपनी मध्ये झालेल्या बैठकीत व्यवस्थापक श्री.चिराग यांच्या कडे गावात फवारणी करण्याची मागणी केली आणि त्यांनी लगेच होकार देवून फवारणी करण्याचे मान्य केले. आणि लगेच निलॉन्स कंपनीच्या वतीने सर्व उत्राण गावात दत्तनगर पासुन फवारणी सुरु केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन, प्रकाश कुवर, वैभव महाजन, पोलीस पाटील, राजेंद्र महाजन, कंपनीचे प्रतिनिधी अशोक चौधरी, ग्रा. पं. कर्मचारी अशोक चव्हाण, विलास महाजन, राहुल महाजन उपस्थित होते. तसेच कंपनी मध्ये बाहेरून येणार्‍या सर्व गाड्या ह्या गेट बाहेर लावून आधी यांचे निर्जतुकीकरण करण्याच्या सूचना अमोल महाजन यांनी दिल्या. कंपनी प्रशासनाने याला तातडीने मान्यता देखील दिली.

Protected Content