असममध्ये महापूर ; आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू !

दिसपूर (वृत्तसंस्था) असाममध्ये आलेल्या महापूरात राज्यात आतापर्यंत ९७ जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे २६ लाख नागरिकांचे जनजीवन या महापूरामुळे अस्ताव्यस्त झाले आहे. असम राज्य आपत्ती व्यवस्थाापन प्राधिकरण द्वारा प्राप्त माहितीनुसार, राज्यातील ३३ पैकी २७ जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला आहे.

 

राज्य सरकारने सांगितले की, काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह येथील बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. काही प्राणयाचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४ गेंडे, ५ जंगली म्हशी, ८ रानडुक्कर, दोन हरीण, ९५ हरीण, एक असजगर अशा व्यन्य प्राणांचा समावेश आहे. तर महापूर आणि भूस्खलन यांमुळे झाललेल्या एकूण मृतांचा आकडा आता १२३ वर पोहोचला आहे. एएसडएमएने माहिती देताना सांगितले की, महापूरामुळे ९७ तर भूस्खलनामुळे २६ नागरिकांच्या आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Protected Content