कन्हैयाकुमारसह इतरांवर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जेएनयूमध्ये केलेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पतियाळा हाऊस कोर्टात कन्हैयाकुमारसह इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

तब्बल १२०० पानांच्या या आरोपपत्रावर उद्या सुनावणी होणार आहे. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९ फेब्रुवारी २०१६ला करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप यात ठेवण्यात आला आहे. आयपीसीच्या १२४अ, ३२३, ४६५, १४३, १४९, १४७, १२० ब या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कन्हैयासह सय्यद उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे.

Add Comment

Protected Content