मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिला संदेश

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या अनेक निर्णयांचा उहापोह केला.

पंतप्रधानांचा या वर्षीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. यापूर्वी 29 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधला होता. प्रजासत्ताक दिनी सायंकाळी मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. मोदी यांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, “आपण नव्या विषयावर चर्चा करणार आहोत. मन की बात हा कार्यक्रम शिकण्यासाठी, सांगण्यासाठी आणि सोबत पुढे जाण्यासाठी उत्तम संधी आहे. प्रत्येक महिन्याला हजारो लोक त्यांच्या सूचना, मेहनत आणि अनुभव येथे सांगतात. देशातील पाणी प्रश्नासंदर्भात जल पुर्नभरणाच्या अनेक कल्पना समोर आल्या आहेत. कोरड्या पडलेल्या हातपंपामध्ये पुन्हा पाणी आणण्यासाठी तामिळनाडूतील जल पुर्नभरणाची एक नवीन संकल्पना मिळाली आहे,” असं मोदी म्हणाले.

Protected Content