भुसावळ (निलेश गोरे) काळ कोणताही असो लॉकडाऊनचा किंवा ओपनअपचा. एक समस्या कायम राहते ती म्हणजे प्लॅन तर खुप होतात, पण अंमल होत नाही व परिणामी ध्येय गाठता येत नाही आणि मग येते ती उदासीनता.
लॉकडाऊन नसतांना गोष्टी राहून जात होत्या कारण वेळ भेटत नसण्याचे कारण होते, पण लॉकडाऊन मध्ये पुरेसा वेळ असतांनाही परिस्थिती तीच आहे. हे सर्व टाळण्यासाठी व पटापट ध्येय गाठण्यासाठी एक खास टेक्निक आपल्या समोर मांडत आहे.
आयुष्यातील ध्येय पूर्णत्वास नेणाऱ्या या जादूच्या टेक्निकचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व टेक्निकपेक्षा अतिशय सोपी टेक्निक म्हणजे – वन मिनिट टेक्निक याला तुम्ही प्रिन्सिपल किंवा लॉ देखील म्हणू शकता.
आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरे गाठणारा देश ठरला आहे. We know that the person who plans more archives more…. पण आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य आणि कृतीशीलता ठेवण्यात कमी पडतो.
त्यामुळे ध्येय गाठता येत नाहीत व नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी वन मिनिट टेक्निक एखाद्या जादूसारखी काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी वन मिनीट टेक्निकचाच नियम शिकवेन.
कोणतीही सवय लावायची म्हंटली की kaizen चा मेथड कामात पडतो. यात Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा. (Change +Wisdom). सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असावी लागते. आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे एक मिनिट दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा.
“काय?, फक्त एक मिनिट”आपल्याला हसू येईल किंवा आश्चर्य वाटेल किंवा विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट टेक्निकचा उपयोग हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. नक्की ही टेक्निक आहे तरी काय?
रोज ठरलेल्या वेळेवर निश्चित एक मिनिट द्यायचाय
Every day, At the same time, Just for a minute —
दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे. उगाच इच्छा नसतांना त्यासाठी एकदम दोन-चार तास देणे असा हट्टीपणा नकोच.
आपलं आयुष्य, करिअर किंवा बिझनेसशी निगडित काम एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे. हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. एक मिनिट आपण सहज देवू शकतो. तणाव येत नाही. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो.
● आता कामाला कृतीला सुरुवात करायची.
● कामांची लिस्ट बनवायची.
● त्याला वेळ सेट करायची
● सेट केलेल्या वेळेवर एक मिनिट ते काम करायचं
● हे नियमित करायचं
हो, फक्त एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुस-या दिवशी परत तेच. रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक डेफिनेशन, रोज एक फॉर्म्युला पाठ करायचा, रोज एक मिनिट इंग्रजी बोलायची, रोज एक मिनिट डान्स करायचा, रोज पेंटिंग करायची, कौशल्यात सुधार आणायचा, रोज डोळे बंद करून शांत बसायचं…..
रोज एक काहीही छोटेसे… पण अगदी नियमित
एक मिनिटासाठी कंटाळा येत नाही, कंटाळा गेला की रुची वाढते आणि रुची वाढली की मेहनत वाढते आणि मेहनत वाढली की ध्येय पूर्ण होतात.
तर मग जमेल ना?
सोप्प आहे भो… नक्कीच जमेल
एकदा ध्येयाला गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल.
ज्याने-ज्याने ही वन मिनिट टेक्निक वापरली त्याने ध्येय लवकर गाठलंय. तुम्ही देखील करून पाहा
स्वतःमध्ये बदल घडविण्यासाठी व कौशल्याला धार लावण्यासाठी लॉकडाऊन एक सुवर्ण संधी आहे. ध्येय गाठण्याचा सराव करा, स्वतःला तयार करा कारण कोरोनामुळे सहा महिन्यांतरचे जग फार वेगळे असणार आहे.
निलेश गोरे,
हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस फाउंडेशन, नवशक्ति आर्केड,
जामनेर रोड, भुसावळ.
9922851678