इस्रो आज उपग्रह अवकाशात सोडणार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) कडून आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून १० सॅटलाईट लाँच केली जाणार आहेत. आज दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी ही सॅटलाईट अवकाशात झेपावतील.

इस्रोनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहिकलची (PSLV-C49) ही ५१ वी मोहीम असणार आहे. याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून आणि ९ इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे.

EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालिन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.

श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावण्याची योजना नाही. ज्या ठिकाणाहून लाँचिंग पाहता येतं ती गॅलरी बंद ठेवण्यात येणार आहे. या लाँचिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. सर्वांना ते इस्रोच्या वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर पाहता येईल.

Protected Content