Home Uncategorized बोदवडमध्ये ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित; निवडणुकीची तयारी सुरू

बोदवडमध्ये ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित; निवडणुकीची तयारी सुरू

0
11


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठीचे आरक्षण सोमवारी निश्चित करण्यात आले. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी ज्ञानेश्वर सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालयात सकाळी ११:०० वाजता ही आरक्षण सोडत सभा पार पडली. या सभेला तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निर्देशानुसार आणि राज्य शासनाच्या १२ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) वर्गाचे आरक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी निश्चित केलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे तहसिलदार यांनी सभेच्या सुरुवातीला स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी १९९५ पासून २०२५ पर्यंतच्या विविध कालावधीत काढण्यात आलेल्या आरक्षणाची सविस्तर पार्श्वभूमी उपस्थितांना समजावून सांगितली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (SEBC) अंतर्गत ५० टक्के मर्यादेत जळगाव जिल्ह्याकरिता सुधारित २६६ पदे निश्चित करण्यात आली आहेत. यानुसार बोदवड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १० जागा तर सर्वसाधारण (General) प्रवर्गासाठी २३ जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली, ज्यामध्ये अज्ञान बालक कु. आयुष अमोल वंजारी याच्या हस्ते पारदर्शक बरणीतून चिठ्ठ्या काढून मागास प्रवर्गाच्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (SEBC) करिता निश्चित १० ग्रामपंचायती:
१. आमदगाव
२. कुऱ्हा हरद्रो / शेवगे खुर्द ग्रुप
३. निमखेड
४. नाडगाव
५. हरणखेड
६. जलचक्र बु. / खुर्द ग्रुप
७. हिंगणे
८. वाकी / बोरगाव
९. चिंचखेड प्र.बो.
१०. चिखली बु. / शेवगे खुर्द
सर्वसाधारण प्रवर्गासाठी (General) निश्चित २३ ग्रामपंचायती:
१. सुरवाडे खुर्द
२. जुनोने दिगर
३. मनुर खुर्द
४. वडजी
५. मनुर बु.
६. येवती / रेवती
७. वराड बु. / वराड खुर्द
८. चिंचखेड सिम
९. मानमोडी
१०. मुक्तळ
११. एणगाव
१२. शेलवड
१३. धोंडखेडा
१४. सुरवाडे बु.
१५. घाणखेड
१६. साळशिंगी
१७. गोळेगाव बु. / गोळेगाव खुर्द / धानोरी
१८. कोल्हाडी
१९. विचवे
२०. करंजी / पाचदेवळी
२१. वरखेड बु.
२२. शिरसाळे
२३. भानखेडे प्र.बो.
बोदवड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे सन २०२५ ते २०३० साठीचे आरक्षण तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळ यांच्या उपस्थितीत पारदर्शक चिठ्ठी प्रक्रियेद्वारे यशस्वीपणे जाहीर करण्यात आले.

Protected Content

Play sound