पुणे (वृत्तसंस्था) अवघ्या १५ दिवसानंतर लग्न असलेल्या तरुणाचा सिंहगड रोड परिसरात डम्परने दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय. विराज निकमचा असे मयत तरुणाचे नाव आहे.
पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या नर्हे सर्व्हिस रोडवर बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विराज आपला सहकारी प्रितेश प्रविण शहा याच्यासोबत दुचाकीवरून जात होता. त्यावेळी नवले पुल चौकाजवळ त्याच्या दुचाकीला डम्परने जोरदार धडक दिली. या अपघातात विराज गंभीर जखमी झाला. दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर विराजचा मित्र प्रीतेश देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, विराजचा १९ मार्चला विवाह होणार होता.