दाभोलकर हत्या : हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधले

मुंबई (वृत्तसंस्था) अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधून काढण्यात सीबीआयला यश मिळाले आहे. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलेय.

 

दाभोलकरांच्या हत्येसाठी सापडलेले पिस्तूलच वापरले होते का ? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २०१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचे सांगितले होते. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलेय. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Protected Content