मोठी बातमी : बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल-तलवार चिन्ह

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला अखेर चिन्ह मिळाले आहे.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून रस्सीखेच सुरू होती. काल रात्री अखेर निवडणूक आयोगानं ‘बाळासाहेबांची शिवसेना ‘ हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे. यासोबत ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे. पण शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला होता.

या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे रिक्षा, तुतारी आणि शंख अशी तीन चिन्हांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केल्याची माहिती पहिल्यांना समोर आली होती. प्रत्यक्षात मात्र या गटाने ढाल-तलवार, पिंपळाचे पान आणि तळपता सूर्य ही तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे पाठविली होती. यातून शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालचा सामना एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या ढाल-तलवारशी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content