अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; एका विरोधात गुन्हा दाखल

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातुन एका १७ वर्षीय मुलीला फुस लावून पळवुन नेल्याची घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली असुन याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत वृत्त असे की रावेर शहरातील एका कॉलनीत स्वतःच्या   घराच्या अंगनात पेस्ट करत असतांना.एका १७ वर्षीय मुलीला फुस लावून पळवुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला आरोपी नितेश राठोड यांच्या विरुध्द मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास रावेर पोलिस करीत आहे.

Protected Content