पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार ५ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता अल्पवयीन मुलगी ही शेताजवळून पायी जात असताना गावात राहणारा १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा दुचाकीने तिच्या मागे येऊन तिला म्हणाला की, तू काय इतकी भाव खाते, तु मला आवडते, घरी जाऊन कोणाला सांगू नको, असे सांगून तिचा विनयभंग केला. हा प्रकार अल्पवयीन मुलीने घरी सांगितल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.