पाचोरा, प्रतिनिधी । नगर परिषदेतर्फे छोट्या व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या कर्ज योजनेत रिक्षाचालकांचा समावेश करण्यात यावा अशी एकता अॅटो रिक्षा चालक मालक युनियनतर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन केली आहे.

छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना शासनातर्फे जी आर्थिक मदत (कर्ज) देण्यात येणार आहे. त्या योजनांमध्ये रिक्षाचालकांना सुद्धा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी एकता ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे एकनाथ सदनशिव, सुनिल शिंदे, सुधाकर महाजन, अनिल लोंढे, गणेश पाटील, अशोक निंबाळकर व रिक्षा चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.