मुंबई (वृत्तसंस्थ) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारने आज आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या आमच्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत यांनी आत्मसात केली. शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. केवळ पीककर्ज यांनी समाविष्ट केले. त्यामुळे शेडनेट, पशुपालन असे सर्व प्रकारचे कर्ज या नव्या कर्जमाफीत समाविष्ट नाही, जे आमच्या काळात समाविष्ट होते असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी यावेळी उपस्थित होते.