अर्णव गोस्वामींना तीन दिवस आधी हल्ल्याची माहिती कशी?; केंद्राने उत्तर द्यावं: अनिल देशमुख

 

नागपूर: वृत्तसंस्था । बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याची माहिती जाहीर होणं ही चिंताजनकबाब आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी कशी मिळाली? केंद्र सरकारने याबाबत उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. २६ फेब्रुवारी २०१९ला बालाकोटमध्ये हल्ला झाला. अर्णव गोस्वामी यांना २३ तारखेला ही बातमी कळली. त्यांना तीन दिवस आधी ही माहिती कशी मिळाली. हल्ल्याची माहिती केवळ चारपाच महत्त्वाच्या नेत्यांनाच असते. केंद्रीय मंत्र्यांनाही ही माहिती नसते. मग अर्णव यांना ही माहिती कशी मिळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे, असं देशमुख म्हणाले.

अर्णव यांच्या चॅटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. बालाकोट हल्ले से चुनाव का वातावरण बदल जायेगा और बडे बॉस को फायदा होगा, असं अर्णव यांनी या चॅटमध्ये म्हटलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. अर्णव बद्दल काय कारवाई करता येईल, याबाबत आम्ही लीगल ओपिनियन मागवलं आहे. कायदेशीर सल्ला आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Protected Content