मंत्रिमंडळाच्या विस्तारात आणखी 36 मंत्र्यांचा सोमवारी शपथविधी

udhdhav thakarey

मुंबई वृत्तसंस्था । महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी, ३० डिसेंबर रोजी होणार असून एकूण ३६ मंत्री यावेळी शपथ घेणार आहेत. यात २८ कॅबिनेट, तर आठ राज्यमंत्र्यांचा समावेश असल्याचे सुत्रांकडून माहीती मिळाली आहे. विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये मंत्रिपदावर वर्णी लावण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच इतर मंत्र्यांचे शपथविधी पार पडतील अशी अपेक्षा सत्ताधारी नेत्यांकडून बोलले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची भूमिका घेतली. त्यानुसार २४ डिसेंबरला शपथविधी घेण्याबाबत आवश्यक ती तयारी करण्यात आली, मात्र काँग्रेसची यादी अंतिम होत नसल्याने अखेर हा शपथविधी ३० डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. विधानभवनात पार पडणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री शपथ घेतील, तर काँग्रेसकडून आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेतील.

Protected Content