अर्णब गोस्वामी यांची त्यांच्याच शो मध्ये ‘बोलती बंद’

 

मुंबई : वृत्तसंस्था| रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या शो मध्ये राहुल यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. राहुल यांचा इटली दौरा आणि शेतकरी आंदोलन या दोन्ही गोष्टींची सांगड त्यांनी घातली, पण त्यांच्याच शो मध्ये त्यांच्यावर गप्प होण्याची वेळ आली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा परदेश दौरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरताना दिसतो आहे. दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यातच काँग्रेसचा वर्धापन दिनही नुकताच साजरा झाला. देशभरात पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचा १३६वा स्थापना दिवस साजरा करत असताना राहुल मात्र आदल्या दिवशीच इटलीला निघून गेले.

“२०१६मध्ये पंजाब काँग्रेस आणि कर्नाटक सरकार अडचणीत होते. त्यावेळी राहुल गांधी विदेशात निघून गेले होते. आता शेतकरी आंदोलन सुरू आहे. तर अशा वेळी ते युरोपला पळून गेले आहेत”, असे अर्णब यांनी विधान केले. त्या विधानावर चर्चेसाठी आलेल्या काँग्रेस प्रवक्त्याने अर्णब यांची बोलती बंद केली. “आपण ३७ मिनिटं चर्चा करतोय पण शेतकरी आत्महत्येबाबत तुम्हीच काहीच का बोलत नाही. उद्योगपतींचं उत्पन्न वाढतंय आणि शेतकरी आणखी गरीब होतोय यावर तुम्ही गप्प आहात. उलटसुलट गोष्टी सांगणं आता बंद करा मिस्टर गोस्वामी. देशातील जनतेला सत्य सांगा. भारत सध्या कठीण काळात आहात. अशा काळात देशवासीयांना एकत्रित आणायला हवं तर तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना दिसत आहात”, असं म्हणत त्यांनी अर्णब यांना गप्प केलं.

याच कार्यक्रमात, काँग्रेसच्या नेत्यांना मंदबुद्धी म्हटलं जातं, असं विधानही अर्णब यांनी केलं होतं. त्यावर काँग्रेस प्रवक्ते म्हणाले की सगळ्या लोकांना माहिती आहे की मंदबुद्धी कोण आहे. भाजपाची सगळी नेतेमंडळी ही बनावट डिग्रीवाली आहे. या साऱ्या नेत्यांनी देशाची अर्थव्यवस्था नीट मार्गी लावण्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही ते म्हणाले.

Protected Content