अरे बापरे जिल्ह्यात 1093 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

 

जळगाव प्रतिनिधी l आज दिवसभरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 1093 इतके कोरोना पॉझिटिव्ह Jalgaon Corona News Today रुग्ण आढळून आले असून यातील सर्वाधिक कोरोना पेशंट हे जळगाव शहरातील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

जळगाव शहरात सर्वाधीक पेशंट

आज जळगाव शहरात सर्वाधीक म्हणजे तब्बल Jalgaon Corona News Today  356 पेशंट आढळून आले आहेत. शहरच्या सर्व भागांमधील हा संसर्ग असल्याचे रिपोर्टमधून दिसून आले आहे. याच्या खालोखाल चोपडा येथे १०० तर चाळीसगावात ९५  कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव तालुका-३६;  भुसावळ -६६.  अमळनेर-७६ ;   पाचोरा-१२; भडगाव-२२; धरणगाव-७०; यावल-४३; एरंडोल-५५; जामनेर-३१; रावेर-३५,  पारोळा-२५ ;  मुक्ताईनगर-३३ ; बोदवड-३३ आणि इतर जिल्ह्यातील ५  असे रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील मृत रूग्णांचा आकडा पंधराशेच्या पार

आज जिल्हाभरात १२  कोरोना बाधीत रूग्णांचे मृत्यू झालेले असल्याची बाब देखील चिंताजनक अशी आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण मृत झालेल्या रूग्णांचा आकडा पंधराशेच्या पार म्हणजे १५१३  इतका पोहचला आहे. तर जिल्ह्यात आज ७०७ रूग्णांना ऑक्सीजन लावण्यात आलेला असून ३४४  रूग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज एकूण ९९७७  इतक्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Protected Content