अमृताच्या संथ गतीच्या कामकाजाबाबत भाजपा नगरसेवक आक्रमक

 

जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेत विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली याप्रसंगी शहरात सुरु असलेल्या अमृताच्या संथ कामासंदर्भात भाजप गटनेते भगत बालाणी यांनी आक्षेप घेत अमृतची काम त्वरित व्हावे अशी मागणी केली.

याप्रसंगी महापौर भारती सोनवणे स्थायी समिती सभापती ऍड शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, भाजपा सभागृहनेते ललित कोल्हे, आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. या बैठकीत कोरोना संदर्भातील आढावा घेण्यात आला. याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नवीन २०० बेडचे केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तसेच डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी आ. महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले.

अमृत योजनेसंदर्भात आढावा घेत असताना नागरिकांच्या आमृतच्या कामाबाबत असलेला रोष भाजपा गटनेते भगत बलानी यांनी आमदार महाजन यांच्या निर्दशनास आणून देत हे काम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी बैठकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. नगरसेवक कैलास सोनवणे, सचिन पाटील आदीं आक्रमक झाले होते. यावर मार्ग काढत आ. महाजन यांनी अमृताच्या कामांबाबत स्वतंत्र बैठक बोलविण्यात येईल असे सांगितले असता गोंधळ कमी झाला.

भुयारी गटारीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या अनुदानांपैकी ४२ कोटी अंतर्गत कामाची माहिती व उर्वरित ५८ कोटींच्या कामाच्या स्थितीची माहिती आ. महाजन यांनी जाणून घेतली. मनपातील रिक्त जागी शासकीय अधिकारी नियुक्तीबाबत पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरले. यासह नगररचना विभागातील बांधकाम परवानगी व विविध परवांग्याबाबत चर्चा करण्यात आली.

Protected Content