जळगावातील बहिणाबाई कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांसाठी उत्तम सुविधा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी। शासकीय तंत्र निकेतन येथे ” लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि लोक संघर्ष मोर्चा ” यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे , त्यास रुग्णांचा प्रतिसाद मिळत असून उत्तम सुविधांमुळे सर्वांचे समाधान होत आहे.

” शासन आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन कोविड रुग्णांसाठी तरुण मंडळीनी निस्वार्थपणे कार्य हाती घेतले आहे. शासकीय तंत्र निकेतन जिल्ह्यात कोरोना या महामारीचा प्रकोप लक्षात घेता जनतेच्या सेवेसाठी ” लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि लोक संघर्ष मोर्चा ” यांच्या संयुक्त विद्यमाने कोणतेही मूल्य न घेता सदर कोविड केअर सेंटर रुग्णसेवेत दाखल केले आहे. या कोविड केअर सेंटरचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या हस्ते नुकतेच झाले.

या कोविड सेंटरमध्ये 126 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे 62 रूम्स आहेत. वेळप्रसंगी ( इमर्जन्सी ) रुग्णाला जर ऑक्सिजनची आवश्यकता वाटली तर ऑक्सिजन किटही उपलब्ध आहे. रुग्णांसाठी या ठिकाणी औषधी , चहा , प्रोटिनयुक्त नाश्ता , फळे , अंडी ,जेवणाची विनामूल्य व्यवस्था या सेंटरतर्फे विनामूल्य करण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरच्या परिसरात तसेच आतमध्ये दिवसातून तीनवेळा सोडियम हायफो क्लोराईडची फवारणी केली जात असते.

माजी महापौर ललित कोल्हे यांच्यातर्फे ‘स्वच्छतादूत’ म्हणजेच पुरुष व स्त्री सफाई कामगार दररोज परिसर स्वच्छ करीत आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ही सेवा विनामूल्य दिली आहे. त्याबद्दल त्यांचे प्रतिभाताई शिंदे ,आणि लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स कल्चरल फाऊंडेशनतर्फे विशेष कौतुक केले आहे.

विनामूल्य कोरोना बाधित रुग्णांवर केवळ उपचार न करता त्यांना दिलासा व मानसिक आधार देऊन आपुलकीचा भावनिक स्पर्श केला जात आहे. लोकसंघर्ष मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंद , सचिन धांडे, चंदन कोल्हे , अभिजित महाजन , पुष्कर नेहते , चंदन अत्तरदे , भूषण बढे आणि सर्व युवा टीम कोविड सेंटरसाठी मेहनत घेत आहेत.

अनेक कोरोना रुग्णांचे नातेवाईक यांच्याकडून सेंटरच्या सर्व टीम , डॉक्टर्स , नर्सेस , वॉर्ड बॉय आदींबद्दल कौतुकाचा दाखला मिळत आहे आणि ते आनंदही व्यक्त करीत आहेत. गेल्या तीन दिवसातच १२४ रुग्ण उपचारार्थ या बहिणाबाई कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. समाजातील सर्व घटकांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांना पाठबळ द्यावे ,अशी अपेक्षा जेष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केली असल्याची माहिती कोविड सेंटरचे जनसंपर्क व प्रसिद्धी विभागाचे तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3202536919814731/

Protected Content