अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महसूल प्रशासनातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये रोहित अशोक पाटील व मयूर जगन्नाथ पाटील हे संयुक्तरित्या प्रथम आले आहेत तर मुलींमध्ये प्रताप महाविद्यालयाची आरती गुलाब भिल प्रथम आली आहे.
गुरुवार दि. ११ ऑगस्ट रोजी सानेगुरुजी शाळेच्या प्रांगणातून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , गटविकास अधिकारी विशाल शिंदे , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलीस उपनिरीक्षक शिरोडे हजर होते. सानेगुरुजी शाळा ते धुळे रोड प्रवेशद्वार व परत तहसील कार्यालय अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मुलांमध्ये रोहित पाटील व मयूर पाटील हे संयुक्तपणे प्रथम आले. द्वितीय जयेश संजय पाटील, तृतीय शुभम पाटील , चतुर्थ यश भिकन पाटील ,पाचवा कुणाल सुनील बोरसे तर मुलींमध्ये आरती भिल प्रथम, द्वितीय हशमा शेख इजाजोद्दीन ,तृतीय पूजा देविदास भिल , चतुर्थ त्रिष्णा मनोज वाघ ,पाचवी ममता देविदास पाटील यांनी विजय मिळवला आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सुनील वाघ, क्रीडा संघटना कार्याध्यक्ष संजय पाटील, प्रा. सचिन पाटील, सचिन वाघ, शिक्षक आर. जे. पाटील, राहुल बहिरम ,के. एस. पवार , विनोद पाटील, आर. एस. घुगे , सॅम शिंगाने ,गोकुळ बोरसे, स्वप्नील पाटील, पंकज पाटील, कमलेश मोरे, हर्षदा सुर्यवशी, पत्रकार समाधान मैराळे, पत्रकार विजय गाढे, प्रिटेश तुरणकर, एन. एल. पाटील, एस. वाय. करंदीकर, माजी सैनिक धनराज पाटील, राजेंद्र यादव, खान्देश रक्षक संघटना, तलाठी संघटना यांचे सहकार्य लाभले.