अमळनेनर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद वतीने ग्रीनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डसाठी अमळनेरात आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित शिबीरात ४५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवीन रेकॉर्ड निर्माण केले. विशेष म्हणजे जळगाव शहरानंतर अमळनेरची आकडेवारी अधिक असल्याने जिल्ह्यात अमळनेर द्वितीय स्थानी राहिले आहे.
याआधी अमळनेर एका दिवशी 300 जणांनी रक्तदान करून रेकॉर्ड केले होते आज आपलेच रेकॉर्ड अमळनेरकरांनी तोडून नवीन रेकॉर्ड केले आहे.काल दि 17 सप्टेंबर रोजी रक्तदानासाठी वेगवेगळ्या 7 ठिकाणी रक्तदानाचे कॅम्प लावण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ अमळनेर, लायन्स क्लब ऑफ अमळनेर, जैन सोशल ग्रुप, अमळनेर, सकल जैन समाज नवयुवक मंडळ, अमळनेर, प्रफुल्ल कॉमर्स क्लासेस अमळनेर, एच.डी.एफ.सी.बँक अमळनेर, श्री स्वामीनारायण मंदिर संस्था , राष्ट्रीय सेवा केंद्र नगर परिषद अमळनेर, मुंदड़ा फाउंडेशन, खानदेश शिक्षण मंडळ व धनदाई महाविद्यालय आणि इतर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने हे मेगा ब्लड डोनेशन ड्राइव तथा महारक्तदान शिबिर आयोजित केले होते, उद्दिष्ट मोठे असल्याने अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने देखील या महा शिबिरास आपले समर्थन देऊन सर्वत्र जाहीर आवाहन केले होते.रक्त संकलनासाठी, तेरापंथ भवन अर्बन बँक मांगे, रोटरी हॉल, पिबीए स्कुल जवळ, टाउन हॉल, स्वामीनारायण मंदिर , प्रताप महाविद्यालय, मुंदडा फाउंडेशन मुंदड़ा नगर गलवाड़े रोड, आणि धनदाई महाविद्यालय ढेकु रोड आदी 7 ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते.तेरापंथ भुवन येथे सकाळी 8 वाजता दादावाड़ी येथे विराजमान परम पूज्य सौम्यांजना श्रीजी मा रा सा आदि ठाणा 3 एव परम पूज्य रेखाश्री जी महाराज साहब आदि थाना 4 यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करून शिबिरास सुरुवात झाली, सर्व केंद्रांवर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत होता, पावसाची रिपरिप सुरू असताना देखील रक्तदाते केंद्रावर पोहोचत होते, यादरम्यान अमळनेर विभागाच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे, माजी आ शिरीष चौधरी यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, शासकीय अधिकारी व पत्रकार बांधवानी रक्तदान केले, तर माजी आ स्मिता वाघ, जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, भैरवी वाघ पलांडे यांनी सर्व केंद्रावर भेटी देऊन प्रोत्साहन दिले, प्रताप महाविद्यालयात लायन्स क्लब च्या केंद्रावर सर्व खा शि मंडळ आणि लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती देऊन विशेष योगदान दिले, याठिकाणी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी रक्तदान केले, तर रोटरी हॉल ला रोटरी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेत रक्तदानही केले, धंनदाई महाविद्यालयात शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले, स्वामींनारायन मंदिरात समस्त भक्तगणांनी रक्तदान केले, टाऊन हॉल भाजप पदाधिकारी, संघ परिवार आणि नागरिकांनी रक्तदान केले.तसेच मुंदडा फाऊंडेशन केंद्रावर अमेय मुंदडा यांनी प्रचंड मेहनत घेऊन जास्तीतजास्त रक्तदान करून घेतले, याठिकाणी महिला रक्तदात्यांची संख्या अधिक होती.
तेरापंथ भुवनात व्यापारी बंधू, सामाजिक कार्यकर्ते, सुरक्षा रक्षक संघटनेतील आजी माजी सैनिक, न प कर्मचारी, एचडीएफसी बँक कर्मचारी, पत्रकार बांधव व नागरिकांनी रक्तदान केले.सदर मोहीम यशस्वीतेसाठी तेरापंथ युवक परिषदेचे प्रतीक जैन, दर्शन जैन, विनीत जैन, कौशल जैन, नितिन जैन, आनंद लोढा, राजेन्द्र बेदमुथा , कैलास लोढा, सुभाष लोढा , प्रकाश लोढा , तेरापंथ महिला मंडल, सकल जैन नवयुवक मंडल, लायन्स क्लब, रोटरी क्लब, एचडीएफसी बँक , प्रफुल्ल कॉमर्स एकेडमी, जैन सोशल ग्रुप , खानदेश रक्षक दल, नगरपरिषद अमळनेर, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुप आदींनी परिश्रम घेतले.