अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे १६ जून रोजी शरद पवार व अजित पवारांसह मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय शिबिर शुक्रवार दिनांक १६ जून २०२३ रोजी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी ८:०० वा पासून आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, पक्षाचे प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या राज्यव्यापी शिबाराच्या आयोजन ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश दादासाहेब पाटील तसेच ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ.रिताताई बाविस्कर यांनी केलेली आहे. या शिबिराच्या कार्यक्रमाचे जंगी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य, प्रदेश समन्वयक ग्रंथालय विभाग तथा महिला प्रदेश सचिव सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर यांनी दिली आहे.