अमळनेरसह ग्रामीण भागात शाळा गजबजल्या

अमळनेर प्रतिनिधी |  शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या. खासकरून अमळनेर शहरातील तसेच ग्रामीण भागातील 5वी ते 7 वी पर्यंत च्या सर्वच शाळा आज गजबजलेल्या दिसून आल्या.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव  संपूर्ण राज्यात असल्यामुळे विध्यार्थ्यांच्या हितास्तव शाळा बंद करण्यात आल्या होत्या.साहजिकच विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन अभ्यासाचे धडे घ्यावे लागत होते. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज अमळनेर तालुक्यातील व शहरातील शाळांमध्ये घंटानाद होतांना दिसून आला. या आधीच कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या ग्रामीण भागात काही महिन्यापूर्वी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होते. तर याउलट शहरी भागांमध्ये कुठलीही शाळा सुरू न करण्याचा  शासनाचे आदेश असल्याने शहरातील शाळामध्ये शुकशुकाट होता. त्यामुळे साहजिकच पक्षांची चिवचिवाट प्रमाणे विद्यार्थ्यांचा किलबिलाट जणू नाहीशी झाली होती. आता मात्र राज्य शासनाने ४  ऑक्टोंबरपासून शहरी व ग्रामीण भागामध्ये पाचवी ते सातवी तसेच आठवी व बारावीचे वर्ग अनुक्रमे सुरू झाले. अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात गुलाबपुष्प तसेच चॉकलेट देऊन टाळ्यांचा गजरात विध्यार्थ्यांचे जगीं स्वागत करण्यात आले. शाळा सुरू होणार म्हणून आदल्या दिवशीच वर्ग सुरू करताना शालेय व्यवस्थापनाने शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे संपूर्ण नियम पाळून शाळा सुरु केली. यात वर्ग सनेटायझर करणे, मास्क वाटप तसेच विद्यार्थ्यांचे स्कॅनिंग करीत वर्गात प्रवेश देण्यात आला.वेळोवेळी  सोशल डिस्टंसिंगचे पालन  देखील केले गेले. तब्बल दीड ते दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर व चेहऱ्यावर आनंद दिसत आला.

 

Protected Content