अभिनेते सर सीन कॉनेरी यांचे निधन

मुंबई- वृत्तसंस्था । जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते सर सीन कॉनेरी यांचम वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांनी सात सिनेमात बॉण्डची भूमिका साकारली होती. स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या सीन यांना ऑस्कर, बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब्ज यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं

काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आलं. यात जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या कलाकारांमध्ये सर्वात आवडता अभिनेता कोण याचंही सर्वेक्षण झालं. यात सर सीन कॉनेरी पहिल्या क्रमांकावर होते. सीन कॉनेरी यांना ४४ टक्के मतं मिळाली. टिमोथी डाल्टन ३२ टक्के मतांनी दुसरे आणि पिअर्स ब्रॉन्सन २३ टक्के मतांनी तिसऱ्या स्थानावर होते.

सर सीन यांच्या अन्य सिनेमांमध्ये ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’, ‘इंडियाना जोन्स आणि द लास्ट क्रूसेड’ आणि ‘द रॉक’ या सिनेमांचा समावेश आहे. सर सीन यांना १९८८ मध्ये ‘द अनटचेबल्स’ साठी ऑस्कर मिळाला होता. या सिनेमात त्यांनी आयरिश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता.

सर सीन कॉनेरी यांना १९५६ मध्ये बीबीसी प्रॉडक्शनच्या सिनेमात कास्ट करण्यात आलं होतं. या एका संधीनंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सीन कॉनेरी यांनी अभिनेत्री डियान क्लिंटोशी लग्न केलं. त्यानंतर १९७६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर सीन कॉनेरी यांनी दुसरं लग्न केलं होतं.

Protected Content